Wed, Jul 17, 2019 12:00होमपेज › Goa › मासळी विक्रेत्या महिलेकडून फ सवणूक

मासळी विक्रेत्या महिलेकडून फ सवणूक

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 07 2018 11:31PMपणजी : प्रतिनिधी 

म्हापसा येथील मासळी विक्रेत्या महिलेकडून मोठया आकाराच्या  कोळंबीच्या विक्रीचे आमिष दाखवून  लहान आकाराच्या कोळंबीची विक्री करुन ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे,अशी माहिती  लाईफ  इज ब्युटीफूल या एनजीओचे अध्यक्ष अ‍ॅशली नोरोन्हा यांनी पणजीतील पत्रकार परिषदेत दिली.  भविष्यात वरील प्रकारे ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी कडक कारवाई करावी, अशी मागणीही नोरोन्हा यांनी केली आहे.

नारोन्हा म्हणाले, की 5 फेब्रुवारी रोजी प्रशिला गावकर या महिलेने पुष्पा नामक मासळी विक्रेत्या महिलेकडून 400 रुपये  किलो या दराने  मोठया आकाराची कोळंबी खरेदी केली होती. मात्र, कोळंबी खरेदी केल्यानंतर काही वेळाने जेव्हा  प्रशिला हिने पिशव्या उघडून पाहिले तेव्हा प्रत्यक्षात  मोठया कोळंबी एवजी लहान आकाराची कोळंबी असल्याचे आढळून आले. आपण फसल्याचे समजताच प्रशिला हिने पुष्पा या मासळी विक्रेत्या महिलेला याचा जाब विचारला. तेव्हा तिने  गयावया करुन माफी मागण्याचा प्रयत्न केला.  

प्रशिला हिने या सर्व गोष्टीने चित्रीकरण मोबाईलवर केले आहे. अशा प्रकारच्या घटना यापूर्वी देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे पुष्पा विरोधात कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे.