Sun, Feb 17, 2019 19:58होमपेज › Goa › फोंड्यात बाँम्बे बाजाराच्या गोदामाला आग : लाखोंची हानी 

फोंड्यात बाँम्बे बाजाराच्या गोदामाला आग : लाखोंची हानी 

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 30 2018 1:32AMफोंडा : प्रतिनिधी

काजीवाडा  येथील काजी इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील  बाँम्बे बाजाराच्या  गोदामाला रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास  आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. फोंडा अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी  4 बंबच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली असून 2 भरलेले गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात यश मिळविले. 

काजी इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून धूर येत असल्याचे समजताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणून  दोन गॅस सिलिंडर सुखरूपबाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. रस्त्याच्या शेजारी इमारत असल्याने काहीवेळ वाहतूक खोळंबली. मात्र पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. 

आग लागल्याची माहिती मिळताच आमदार रवी नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.  आग आटोक्यात आणण्यासाठी दलाला  4 बंबाचा वापर करावा लागला. संध्याकाळी उशिरापर्यंत नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. मात्र दुकान मालकाने 40 लाखाहून अधिक नुकसान झाल्याचा दावा केला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे.  

दरम्यान संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सपना पार्क जवळ असलेल्या अयप्पा मंदिराजवळील नीलकंठ नाईक यांच्या फ्लॅटला आग लागून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. फोंडा अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. सुमारे 2 लाख रुपये किंमतीचे साहित्य वाचविण्यात अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांना यश आले. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.