Tue, Mar 26, 2019 22:06होमपेज › Goa › तिस्क येथे दुकानाला आग; सुमारे आठ लाखांचे नुकसान

तिस्क येथे दुकानाला आग; सुमारे आठ लाखांचे नुकसान

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 10:32PMफोंडा : प्रतिनिधी

तिस्क फोंडा येथील विनायक जनरल स्टोअर या दुकानाला गुरुवारी रात्री 12. 30 वाजण्याच्या सुमारास आग लागून अंदाजे 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा दुकान मालकाने केला आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे अंदाज व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार रात्रीच्या वेळी बंद असलेल्या दुकानातून धूर येत असल्याचे परिसरातील लोकांना समजताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीत दुकानातील साहित्य जाळून खाक झाले आहे. आग शेजारी असलेल्या दुकानात लागण्यापासून वाचविण्यात कर्मचार्‍यांना यश आले. 

फोंडा अग्निशमन दलाचे राजेंद्र तलवार, महंमद शेख, प्रदीप गावकर, सचिन गावकर व योगेश नाईक या कर्मचार्‍यांनी आग विझविली. दुकान मालक विनायक नाईक यांनी आगीत 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. दुकानाला आग लागल्याची माहिती शुक्रवारी सकाळी आमदार रवी नाईक यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन दुकानाची पाहणी केली. विनायक नाईक यांनी नुकतेच बँकेतून कर्ज काढून दुकानात साहित्य खरेदी केले होते. त्यामुळे आगीत अधिक नुकसान झाल्याचे आमदार रवी नाईक यांनी सांगितले. 

Tags : Goa, Fire, Shops, Damage,  around, eight, lakhs