Wed, Sep 26, 2018 15:00होमपेज › Goa › पणसुलेत गॅरेजला आग; ३.५ लाखांची हानी

पणसुलेत गॅरेजला आग; ३.५ लाखांची हानी

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 8:32PM

बुकमार्क करा
फोंडा : वार्ताहर

पणसुले-धारबांदोडा येथील बगलरस्त्यालगत असलेल्या गॅरेजला बुधवारी सकाळी  आग लागून सुमारे 3.5 लाख रुपयांचे नुकसान झाले.दुरूस्तीसाठी गॅरेजमध्ये ठेवलेला एक ट्रक वाचवण्यात स्थानिकांना यश आले.

प्राप्त माहितीनुसार अन्नपूर्णा पाटील यांच्या मालकीचे गॅरेज दिनेश परब चालवत होते.ते गॅरेज बंद करून वाहन दुरूस्तीसाठी बाहेर गेले होते.त्यानंतर 10.45 वाजण्याच्या सुमारास गॅरेजला आग लागली.फोंडा अग्निशमन कार्यालयातील जवानांना 11 वाजता  पाचारण करण्यात आले.दोन बंबाचा वापर करून आग विझवण्यात आली. दिनेश परब  यांनी या आगीमुळे सुमारे 3.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असावी,असा अंदाज व्यक्त होत  आहे.

आग विझवण्यासाठी यशवंत गावस,गोराक्ष नाईक, अमृत नाईक, योगेश नाईक, वासुदेव परब,सच्चिदानंद बांदोडकर, मनोज नाईक यांनी परीश्रम घेतले.