होमपेज › Goa › अमेरिकेत काल्पनिक सुपरमॅन, भारतात प्रत्यक्ष ‘अँग्री यंग मॅन’ : अक्षयकुमार

अमेरिकेत काल्पनिक सुपरमॅन, भारतात प्रत्यक्ष ‘अँग्री यंग मॅन’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

अमेरिकेत सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन यांसारखे काल्पनिक सुपर हिरो आहेत.  आमच्याकडे  भारतात मात्र अमिताभ बच्चन यांच्या रूपाने खराखुरा ‘अँग्री यंग मॅन’ आहे. बच्चन यांच्या जीवनावर सुपर क्रॉमिक पुस्तक निघाले असून त्या पुस्तकाचे नाव ‘सुप्रीमो’ आहे, असे ‘खिलाडी ’ फेम अभिनेता अक्षयकुमार यांनी सांगितले. 

अक्षयकुमार यांनी त्यांची बच्चन यांच्यासमवेतची लहानपणीची आठवण सांगितली. ते म्हणाले की, आपण 13 वर्षांचा असताना 1980 साली पालकांबरोबर काश्मीरमध्ये गेलो असता शूटिंगसाठी तिथे आलेल्या अमिताभ बच्चन यांची ‘स्वाक्षरी’ घेतली होती. त्यावेळी त्यांच्या सहीपेक्षा त्यांच्या टेबलाजवळ ठेवण्यात आलेल्या द्राक्षांकडे आपले अधिक लक्ष होते. मात्र, कनवाळू व ममत्व असलेल्या बच्चन यांनी आपल्याला मूठभर द्राक्षे दिल्यावर आपल्याला अधिक आनंद झाला.