Fri, Nov 16, 2018 03:26होमपेज › Goa › फेस्तासाठी सकाळपासून भाविकांची एकच गर्दी

फेस्तासाठी सकाळपासून भाविकांची एकच गर्दी

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 05 2017 1:48AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

जुने गोवे येथे सोमवारी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्तास लाखो भाविकांनी उपस्थिती लावली. सकाळी लवकरच भाविकांनी चर्चच्या प्रांगणात प्रार्थनेसाठी मोठी गर्दी केली होती. फेस्तासाठी ख्रिश्‍चन भाविकांसह, देश-परदेेशातील भाविक उपस्थित होते. लोक सहकुटुंब फेस्तासाठी आले होते. सकाळी 10.30 वाजता प्रार्थना सभेला सुरुवात झाली. आर्चबिशप यांच्या संदेशानंतर लोकांनी प्रार्थना केली. सर्वांनी सायबाचे दर्शन घेतले. मुख्य प्रार्थनेनंतर लोकांनी एकमेकांना फेस्ताच्या शुभेच्छा दिल्या. 

जुने गोवे परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून चर्च प्रांगणात जाण्यार्‍या सर्व  प्रवेशव्दारांवर मेटल डिटेक्टर मशीन बसविण्यात आले असून भाविकांची तपासणी करूनच त्यांना सभा मंडपात प्रवेश दिला जात होता. चर्च परिसरात अग्निशमन दलाचे जवानही तैनात होते. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था जुने गोवेजवळील बायपास मार्गावर करण्यात आल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार यंदा कमी दिसून आले. 

भाविकांनी फेस्ता निमित्त मोठ्या प्रमाणात खरेदी केली. फेस्तानिमित्त विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहेत. खाजे,चणे-फुटाणे, लाडू, तयार कपडे, चपलाची दुकाने, घरगुती साहित्याच्या दुकानांसह खेळण्यांची दुकानेही मोठ्या प्रमाणात आहेत. फेस्तात बहुतेक व्यावसायिक हे मागील पंचवीस ते तीस वर्षांपासून व्यवसाय करण्यास येतात.