Tue, Sep 25, 2018 00:44होमपेज › Goa › श्रीलंकेतून नारळ आयातीचा विचार चुकीचा : कुतिन्हो

श्रीलंकेतून नारळ आयातीचा विचार चुकीचा : कुतिन्हो

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:57PMमडगाव : प्रतिनिधी

नारळ महागल्याने गोमंतकीय हैराण झाले असून  गोंय गोयकार गोंयकारपण या मूलमंत्रावर आधारित गोवा फॉरवर्डचे पक्ष चिन्ह नारळ असून तेच श्रीलंकेहून आयात करण्याचा जो विचार कृषिमंत्री तथा पक्षाचे नेते विजय सरदेसाई करतात, तो अत्यंत चुकीचा आहे, असे गोवा महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो  यांनी सांगितले.  मडगाव येथे गोवा महिला प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात 40 ते 45 रुपयांत मिळणार नारळ 15 ते 20 रुपये इतक्या कमी दरात देऊन तब्बल 400 नारळांची विक्री केली.

मडगावच्या कोमुनिदाद इमारतीजवळ राबवलेल्या नारळ विक्री उपक्रमावेळी गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष  प्रतिमा कुतिन्हो, दक्षिण गोवा काँग्रेस महिला अध्यक्षा सावित्री कवळेकर व इतर उपस्थित होते.

कुतिन्हो म्हणाल्या की, जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने महागाई  वाढवून सरकारने आधीच सामान्यांच्या पोटाला चिमटा काढला आहे. नारळ हा गोमंतकीयांचा दैनंदिन जीवनाचा भाग असून जेवणात वापरला जाणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे. शिवाय हिंदूच्या प्रत्येक देवकार्याला लागणारे श्रीफळ आहे. यावर दर वाढवून  सरकारने सर्व गोमंतकीयांवर प्रचंड संकट आणले आहे.

एकूण 400 नारळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणले होते. राज्यात नारळांची किंमत 40ते 45 रुपये असताना महिला काँग्रेसने 15ते 20 च्या दरात विक्री केली. गोवा प्रदेश महिला काँग्रेस च्या महिलांना यापूर्वी केपे, पणजी, असोळणा, शिवोली, थिवी, या इतर शहरांत केली असून   बुधवारी(आज) सकाळी 11 वाजता फातोर्डा येथे स्वस्त दरात  नारळ विक्री करणार असल्याचे कुतिन्हो म्हणाल्या.