Sat, Jul 20, 2019 13:26होमपेज › Goa › फेलिक्स खून प्रकरण सीबीआयकडे सोपवा; उच्च न्यायालयाचे निर्देश 

फेलिक्स खून प्रकरण सीबीआयकडे सोपवा; उच्च न्यायालयाचे निर्देश 

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 1:19AMपणजी : प्रतिनिधी

काणकोण येथे 2015 साली झालेल्या  स्विडिश नागरिक फेलिक्स डहाल याच्या  खून प्रकरणाची चौकशी  सीबीआयला सोपवण्याचे निर्देश मुंबई  उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने   शुक्रवारी दिले.

फेलिक्स खून प्रकरण  काणकोण पोलिसांकडे आहे. मात्र, तपासकामाबाबत असमाधान व्यक्‍त करून फेलिक्सच्या आईने हे प्रकरण कोणकाण पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात 2017 साली दाखल केली होती.

फेलिक्स हा 22 वर्षीय तरुण   ऑक्टोबर 2014 मध्ये भारतात पर्यटनासाठी आला होता. इतर राज्ये पाहिल्यानंतर तो गोव्यात  आला असता जानेवारी 2015 मध्ये काणकोण येथे त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. काणकोण पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी खुनाचा संशय व्यक्‍त केला होता. त्यानंतर काणकोण प्रथमवर्ग  न्यायदंडाधिकार्‍यांनी काणकोण पोलिसांना या प्रकरणाची नोंद खूून म्हणून करण्याचे निर्देश दिले होते. परंतु पुराव्याअभावी अजूनही पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले नाही.