Tue, Apr 23, 2019 08:25होमपेज › Goa › परप्रांतीय मासळी वितरकांविरुद्ध ‘बायलांचो एकवोट’ची तक्रार

परप्रांतीय मासळी वितरकांविरुद्ध ‘बायलांचो एकवोट’ची तक्रार

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 1:30AMमडगाव : प्रतिनिधी

मृतदेह जतन करून ठेवण्यासाठी वापरले जाणारे फार्मोलिन  नामक रसायन मासळीसाठी वापरणार्‍या आणि मडगावच्या घाऊक मासळी बाजारात ती मासळी वितरित करणार्‍या  परप्रांतीय मासळी वितरकांविरुद्ध बायलांचो एकवोट या संघटनेने बुधवारी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र  आणि ओडिशा आदी राज्यांतून मडगावच्या घाऊक मासळी बाजारात मासळी दाखल होते. परराज्यातून येणार्‍या मासळीत फार्मोलिन या घातक रसायनाचा वापर होत असल्याचे उघड झाल्याने वरील सर्व राज्यांतील मासळी विक्रेत्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्याचे बायलांचो एकवोटच्या अध्यक्षा आवदा व्हिएगस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

फार्मोलिनमुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे, असे सिद्ध झाले आहे. मासळी ताजी राहण्याकरिता मासळीत फॉर्मोलिनचा वापर केला जातो आणि तेच फॉर्मोलिनचे मासे मडगावच्या घाऊक मासळी बाजारातून राज्यभर विकले जातात. लोकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या मासळी विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी व्हिएगस यांनी केली आहे. प्रसिद्धीला आणलेल्या पत्रकात व्हिएगस यांनी दिलेल्या माहितीनुसार या फॉर्मोलिनचा वापर मृतदेह टिकून राहण्यासाठी केला जातो. मासळी हे गोमंतकियांच्या ताटातील मुख्य घटक आहे.

आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यातून गोव्यात मासळी पुरवठा करणार्‍या वितारकांविरोधात भारतीय दंड संहिता कलम  आणि  अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना ताबडतोब अटक करावी, अशी मागणी आवदा व्हिएगस यांनी केली आहे.

यकृत निकामी; कर्करोग शक्य

फार्मोलिनमुळे कर्करोग होण्याची शक्यता आहे,असे सिद्ध झाले आहे. मासळीमधून फॉर्मेलीन शरीरात गेल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊन यकृत निकामी होण्याची शक्यता आहे.गोव्यात पुरवठा केले जाणारे मासे,भाजी,मास याची योग्य तपासणी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.