Tue, Sep 25, 2018 10:57होमपेज › Goa › बनावट कागदपत्र प्रकरणी पंचायत सदस्याविरूध्द गुन्हा

बनावट कागदपत्र प्रकरणी पंचायत सदस्याविरूध्द गुन्हा

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:56PMपणजी : प्रतिनिधी

पंचायत निवडणूक काळात  जातीचा दाखला मिळवण्यासाठी तिसवाडी उपजिल्हाधिकारी कार्यालयाला बनावट   प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सांताक्रुझ पंचायतीचे सदस्य लॉरेन्स रॉड्रिग्स यांच्या विरोधात पणजी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. रॉड्रिग्स विरोधात गणेश चोडणकर यांनी सदर तक्रार दाखल केली होती.  प्राथमिक तपासानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी पार पडलेल्या   पंचायत निवडणूक  काळात  सांताक्रुझ पंचायतीच्या प्रभाग तीन मधून लॉरेन्स  रॉड्रिग्स यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यानुसार त्यांनी  जुलै 2017 मध्ये   निवडणूकीसाठी    तिसवाडी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे ओबीसी जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता. जातीचा दाखला मिळवण्यासाठी त्यांनी सदर कार्यालयाकडे बनावट बोनाफाईड प्रमाणपत्र सादर केले होते. याप्रकरणी पणजी पोलिस स्थानकाच्या महिला उपनिरीक्षक रश्मी भाईडकर पुढील तपास करीत आहेत.