Tue, Mar 26, 2019 08:21होमपेज › Goa › माजी पोलिस उपमहानिरीक्षक गुप्ता यांच्यासह तिघांविरुद्ध एफआयआर  

माजी पोलिस उपमहानिरीक्षक गुप्ता यांच्यासह तिघांविरुद्ध एफआयआर  

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 1:19AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी  

गोव्याचे माजी  पोलिस उपमहानिरीक्षक विमल आनंद गुप्ता, निलंबित महिला पोलिस उपनिरीक्षक देवयानी आंबेकर, तिचा पती व निलंबित पोलिस कॉन्स्टेबल चेतन मोरजकर यांच्या  विरोधात भ्रष्टाचार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक  खात्याने एफआयआर नोंदवल्याची  माहिती पथकाच्या सूत्रांनी दिली.

उपनिरीक्षक आंबेकर यांची एका प्रकरणात खात्यांतर्गत चौकशी  सुरू असून या प्रकरणाची फाईल बंद करण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक  गुप्ता  यांनी लाच मागितल्याचा  त्यांच्यावर आरोप  आहे. तर पोलिस कॉन्स्टेबल मोरजकर  हा अधिकार्‍यांना पैसे पोहोचवण्याचे काम करीत  असल्याचा ठपका ठेवण्यात आला  आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला उपनिरीक्षक आंबेकर व मोरजकर  यांना निलंबित केले तर उपमहानिरीक्षक  गुप्ता यांची गोव्यातून  बदली करण्यात आली  आहे. या  प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक  खात्याकडून  चौकशी सुरू  आहे.