Thu, Apr 25, 2019 15:24होमपेज › Goa › प्रतिमा कुतिन्हो, सावित्री कवळेकर यांच्यासह चौघांविरुद्ध एफआयआर

प्रतिमा कुतिन्हो, सावित्री कवळेकर यांच्यासह चौघांविरुद्ध एफआयआर

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 1:11AMपणजी : प्रतिनिधी 

सांगे येथील अल्पवयीन पीडित युवतीची ओळख सार्वजनिक केल्याप्रकरणी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह चार जणांविरोधात पणजी पोलिस स्थानकाने गुरुवारी एफआयआर नोंदवला.

दक्षिण गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तथा विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर, नेत्रावळी पंचायतीचे उपसरपंच अभिजीत देसाई तसेच पंचायत सदस्य विठ्ठल गावकर व  प्रकाश भगत यांचा या एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला आहे.

पोलिसांनी या सर्व जणांविरोधात   पॉस्को तसेच  जुवेनाईल जस्टीस  कायदा 2012 अंतर्गत विनयभंग झालेल्या  अल्पवयीन पीडितेची ओळख जाहीर केल्याप्रकरणी शिवसेना गोवा राज्याच्या उपराज्यप्रमुख तथा प्रवक्त्या राखी  प्रभुदेसाई नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

पीडित युवतीचा झारखंड येथील युवकाने विनयभंग केला होता. सदर घटना समजताच  कुतिन्हो तसेच अन्य संशयितांनी सांगे येथील अल्पवयीन पीडितेेच्या घरी जाऊन 8 जुलै रोजी  तिची भेट  घेतली होती. या भेटीनंतर पीडितेच्या आई-वडिलांसोबतचे  फोटो  सोशल मीडियावर प्रसृत केले  होते.