Sun, Mar 24, 2019 23:27
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › स्पीड गव्हर्नर बसवण्याची ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

स्पीड गव्हर्नर बसवण्याची ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:13AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील सुमारे 17 हजार पर्यटक टॅक्सींना काही अंशी दिलासा देताना राज्य सरकारने त्यांना ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याची मुदत 31 जुलै2018 पर्यंत देण्यास मान्यता दिली आहे. वाहतूक खात्याचे संचालक निखील देसाई यांनी सदर अधिसूचना गुरुवारी जारी केली. 

पर्यटक टॅक्सीमालकांनी गेल्या आठवड्यात तीन दिवस केलेल्या संपामुळे राज्यातील जनतेचे हाल झाले होते. टॅक्सींना ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याबाबत सरकारने मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने हा संप पुकारण्यात आला होता. राज्य सरकारने 24 फेब्रुवारी 2018 ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्यासाठी ही अंतिम तारीख दिली होती.  टॅक्सीवाल्यांच्या दबावामुळे त्यांना किमान एक वर्षाची मुदत देण्याची सरकारने प्रक्रीया सुरू केली होती. मात्र,‘स्पीड गव्हर्नर’ उत्पादन करणार्‍या कंपन्यांनी हवे तेव्हढे यंत्रे पुरवण्याची तयारी असल्याचा संदेश सरकारकडे पोचवल्याने आता ही मुदत सहा महिन्यांपुरती करण्याचे वाहतूक खात्याने निश्‍चित केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

संचालक देसाई यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे, की राज्यातील ज्या चारचाकी वाहतूक करणार्‍या वाहनांचे वजन 3500 किलोच्या खाली आहे. तसेच सदर वाहने प्रवाशी अथवा साहित्य वाहतुकीसाठी वापरली जात आहेत. अशा सर्व वाहनांना केंद्रीय मोटर वाहन कायदा-1989 च्या कलम-118 नुसार ‘स्पीड गव्हर्नर’  बसवण्याची मुदत 31 जुलै-2018 पर्यंत वाढवण्यात आली आहे.  
या अधिसूचनेत,  दोन अथवा तीन उत्पादक कंपन्यांकडून वाजवी दरात ‘स्पीड गव्हर्नर’ उपलब्ध होणे अथवा 31 जुलै-2018 ही तारीखेपर्यंत मूभा दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.