Thu, Jan 24, 2019 16:04होमपेज › Goa › गोवा मराठी अकादमीतर्फे 24 रोजी सांगितीक कार्यक्रम

गोवा मराठी अकादमीतर्फे 24 रोजी सांगितीक कार्यक्रम

Published On: May 19 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 11:16PMपणजी : प्रतिनिधी

गोवा मराठी अकादमीच्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त 24 मे रोजी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात दुपारी 3  वा. सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात  नामवंत लेखक तथा संगीतकार राजेंद्र वैशंपायन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील,अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.सामंत म्हणाले, कार्यक्रमात दुपारी 3 वा. मनात सतत पिंगा घालणार्‍या मराठी गाण्यांची मैफल ‘सुरेल आठवणी’ या कार्यक्रमातून अक्षय नाईक सादर करतील. त्यानंतर 3.30 वाजता ‘देखणी ती पाऊले’ या सत्रात मराठी कला व संस्कृतीच्या क्षेत्रात चमकणार्‍या तेजस्वी कलाकारांशी हितगुज होईल. यात डॉ. प्रवीण गावकर, नीलांगी शिंदे व सूर्यकांत गावकर सहभागी होतील. 

त्यानंतर गोमंतकीय मराठी साहित्य व संस्कृती क्षेत्रातील कार्याबद्दल  डॉ. एस.एस. नाडकर्णी, डॉ. श्रीकृष्ण अडसूळ व नरहरी हळदणकर यांचा सन्मान केला जाईल. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. गोविंद भगत करतील,असे  त्यांनी सांगितले.  अकादमीतर्फे  महिला संमेलन, सृजन संगम, महामराठी संमेलन अशा कार्यक्रमांचे  आयोजन केले जात आहे. अकराही तालुक्यात हे कार्यक्रम होत असून   पन्नास गोमंतकीय लेखकांची पुस्तके अकादमीने अनुदान देऊन प्रकाशित केली आहेत. पत्रकार परिषदेत वल्लभ केळकर, दीपक देसाई, बबन पंडित, अशोक नाईक, नरहरी हळदणकर, विठ्ठल प्रभुदेसाई, आनंद नाईक व प्रकाश गाडगीळ उपस्थितहोते.