Sat, Nov 17, 2018 16:35



होमपेज › Goa › गोवा, पोर्तुगालच्या संस्कृतीत साम्य : प्रा. गुरा

गोवा, पोर्तुगालच्या संस्कृतीत साम्य : प्रा. गुरा

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 11:50PM



मडगाव : प्रतिनिधी

गोवा आणि पोर्तुगालच्या संस्कृतीत भेद असले तरी साम्यही खूप आहे. पोर्तुगाल व गोव्याचे कलाप्रकार एकमेकांशी मिळतेजुळते आहेत, असे  पोर्तुगालच्या प्राध्यापिका पावला दे गुरा यांनी पत्रकार परिषदेत  सांगितले.

मडगाव येथील पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय आणि पोर्तुगालच्या पोर्तु विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत प्रा. गुरा या गोव्यात आल्या होत्या.  गुरा यांनी 31 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंतच्या गोव्यातील वास्तव्याबाबत अनुभव कथन केले. 

त्या म्हणाल्या, की गोव्याच्या व पोर्तुगालच्या बोली भाषेतील अनेक शब्दांमध्ये साम्य आहे. पोर्तुगालमध्येही गोव्यासारखेच कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते. पोर्तुगीज व गोमंतकीयांच्या राहणीमानात जरी वेगळेपण असले तरी संस्कृतीमध्ये साम्यता आढळून येते. गोव्यात ज्या प्रकारचे संगीत आहे त्याच प्रकारचे संगीत पोर्तुगालमध्येही दिसून येते. गोव्याची आडनावे व पोर्तुगाल येथील लोकांच्या आडनावात साम्य  आढळून येत असून पोर्तुगालचे पंतप्रधान अंटॉनियो कॉस्ता हे मूळचे गोव्याचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

गोवा व पोर्तुगाल या दोन्ही ठिकाणच्या संस्कृतींचा अभ्यास व संशोधन या उद्देशाने सदर करार करण्यात आला असून येत्या काळात गोव्यातील प्राध्यापकही पोर्तुगाल मध्ये जाऊन त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करू शकतात, असे महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रा. सचिन मोरायस यावेळी म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत मराठी विभाग प्रमुख प्रा. श्रीकृष्ण अडसूळ, प्रा. सारिका आडविलकर व इतर उपस्थित होते.