Sat, Sep 22, 2018 14:36होमपेज › Goa › आणीबाणीचा कालखंड काळोखी : मुख्यमंत्री पर्रीकर

आणीबाणीचा कालखंड काळोखी : मुख्यमंत्री पर्रीकर

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 27 2018 12:18AMपणजी : प्रतिनिधी

देशाच्या वैभवशाली लोकशाहीच्या इतिहासातील आणीबाणी हा सर्वात काळोखी असा कालखंड होता, असे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्‍त केले.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेस सरकारच्या कालावधीत 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी   जाहीर केली होती. या घटनेच्या 43 व्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री पर्रीकर  यांनी काँग्रेस सरकारने सामान्यांवर केलेल्या अत्याचाराविरोधात लढा दिलेल्यांचे स्मरण करून त्यांची प्रशंसा केली. आपल्या ट्विटर संदेशात पर्रीकर यांनी म्हटले आहे की, भारतीयांच्या स्वातंत्र्यावर आणि घटनादत्त हक्‍कांवर  तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गदा आणून राष्ट्रीय स्तरावर आणीबाणी जाहीर केली. या निर्णयामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या संतापाच्या लाटेचे जनअांदोलनात  रूपांतर झाले होते. या आंदोलनामुळे गांधी यांना 1977 साली आणीबाणी मागे घेणे भाग पडले. या लढ्यात  अनेक विरोधी नेत्यांची धरपकड झाली होती. भारतीय जनता पक्षाने आणीबाणीतील धोका जनतेला समजावण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या हुकूमशाहीविरोधात लढा दिलेल्यांना आपला सलाम.