Wed, Jul 17, 2019 20:03होमपेज › Goa › एप्रिलपासून पुन्हा वीज दरवाढीचा ‘शॉक’

एप्रिलपासून पुन्हा वीज दरवाढीचा ‘शॉक’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्यातील वीज ग्राहकांना 2018-19 या आर्थिक वर्षासाठी विजेच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज खात्याने संयुक्‍त वीज नियामक आयोगाकडे (जेईआरसी) पाठवला आहे. आयोगाने या वीज दरवाढीला मान्यता दिल्यास ग्राहकांना एप्रिल-2018 पासून वीज दरवाढीचा काही प्रमाणात ‘शॉक’ बसण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

वीज खात्याने 2018-19 आर्थिक वर्षासाठी सुमारे 79 कोटी रुपयांची महसुली तूट भरून काढण्यासाठी वीजदरात वाढ करण्याचा प्रस्ताव जेईआरसीकडे पाठवला आहे. राज्यातील विविध गटांतील ग्राहकांना दरमहा देण्यात येणार्‍या  बिलात  सुमारे 5 ते 40 रूपयांच्या दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. सर्वाधिक दरवाढीचा फटका 20 ते 90 केव्ही गटातील व्यावसायिक ग्राहकांना बसणार असून त्यांना एकूण बिलावर सुमारे 50 ते कमाल 90 रुपये इतकी वाढ सुचवण्यात आली आहे. याशिवाय घरगुती थ्री-फेज ग्राहकांना  सध्याच्या वीज बिलांमध्ये अतिरिक्‍त 35 रुपयांची वाढ होणार आहे. 

घरगुती विभागातील सिंगल फेज तसेच कृषी अथवा सिंचनासाठी पंप असलेल्या ग्राहकांना सुमारे 25 टक्के, 0 ते 20 केव्ही व्यावसायिक गटातील ग्राहकांना 20 टक्के, कमी वीज दाब असलेल्या उद्योगांना 17 टक्के  आणि शेतीसाठी वापरत असलेल्या विजेसाठी सरसकट 20 टक्के तसेच उच्च दाबाच्या घरगुती ग्राहकांसाठी 7 टक्के दरवाढ सूचित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

तसेच वीज बिलातील ऊर्जा शुल्कातही खात्याने 1.5 ते 15 टक्के दरवाढीचा प्रस्ताव  ठेवला आहे. यामुळे ग्राहकांना प्रत्येक युनिटमागे 5 ते 50 पैसे इतक्या अतिरिक्‍त वाढीला तोंड द्यावे लागणार आहे. याशिवाय कृषी विभागातील ग्राहकांना 12.5 ते 15 टक्के वाढ सोसावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

 

Tags ; goa, goa news, Electricity, Electricity rates, 


  •