Thu, Apr 25, 2019 12:26होमपेज › Goa › वीज कर्मचारी मृत्यूप्रकरणी चौकशी करा

वीज कर्मचारी मृत्यूप्रकरणी चौकशी करा

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 03 2018 11:58PMपणजी : प्रतिनिधी  

सांगे येथील वीज कार्यालयातील कर्मचारी देविदास वेळीप यांचा विजेचा धक्का  बसून झालेल्या मृत्यू प्रकरणी वीज खात्याने चौकशी करावी व वेळीप कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी गोवा शिवसेनेच्या प्रवक्त्या राखी प्रभूदेसाई नाईक यांनी खात्याकडे निवेदनाव्दारे केली.मुख्य वीज अभियंत्यांना गुरुवारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन सादर केले. 

नाईक म्हणाल्या, की वेळीप हे मदतनीस होते, त्यांनी लाईनमनला सहाय्य करणेच अपेक्षित होते. लाइनमनला विजेबाबतचे आणि वीजवाहक तारेत निर्माण झालेली समस्या कशी हाताळावयाची याचे ज्ञान असते. मात्र, वेळीप यांना वीज वाहिनीचे काम करण्यास पाठवण्यात आले. ही बाब धक्कादायक आहे.  या  गोष्टीस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी. मृत मदतीस हे त्यांच्या  कुटुंबाचा एकमेव कर्ता पुरुष असल्याने त्याच्या पत्नीला वीज खात्यात त्वरित नोकरी द्यावी, अशीही मागणी मुख्य वीज अभियंत्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.कार्यकारिणीचे सदस्य वंदना लोबो, झायगल लोबो, रजनी वेळुस्कर, श्रीकृष्ण वेळुस्कर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष अलेक्सी फर्नांडिस, केपे तालुका प्रमुख संजय देसाई उपस्थित होते.

Tags : Goa, Electricity, inquiries, case, death, employee