Thu, Jul 18, 2019 16:34होमपेज › Goa › पणजी महापौरपदाची निवडणूक १४ मार्चला  

पणजी महापौरपदाची निवडणूक १४ मार्चला  

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 07 2018 12:02AMपणजी : प्रतिनिधी

पणजी महानगरपालिकेच्या (मनपा) महापौर व उपमहापौर पदांसाठीची 14 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना मंगळवारी जारी करण्यात आली आहे.

दरम्यान, महापौर हा मोन्सेरात गटाचाच असेल, असे सांगून भाजप गटाच्या उमेदवाराला आपण पाठिंबा देणार आहे, ही केवळ अफवा आहे. आपण कुणालाही पाठिंबा देणार नाही, असे बाबूश मोन्सेरात  यांनी स्पष्ट केले आहे.

मनपा निवडणुकीत पणजीच्या लोकांनी आम्हाला बहुमत दिले.  त्यामुळे भाजप उमेदवाराला महापौर पदासाठी पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांवर आमचाच उमेदवार असणार आहे. त्यामुळे भाजप उमेदवाराला पाठींबा देण्यात येईल या केवळ अफवा आहेत, असे मोन्सेरात यांनी सांगितले. उपमहापौर पदासाठी अस्मिता केरकर यांचे नाव उमेदवार म्हणून निश्‍चित करण्यात आले आहे. तर   निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 मार्च रोजी महापौरपदाचा  उमेदवार ठरणार असल्याचेही मोन्सेरात यांनी स्पष्ट केले. महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवार निश्‍चित करण्यासाठी भाजप  नगरसेवक गटाची येत्या दोन  दिवसांत  पणजीचे माजी आमदार  सिध्दार्थ कुंकळ्ेयकर  यांच्या  सोबत बैठक होणार आहे.