होमपेज › Goa › ‘ईव्हीएम’विषयी निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे

‘ईव्हीएम’विषयी निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे

Published On: Aug 30 2018 1:17AM | Last Updated: Aug 29 2018 11:31PMपणजी : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणूक  जर उमेदवारांनी मोठया संख्येने लढवली तर ईव्हीएम मशिन  कशा पध्दतीने काम करेल,  यावर  निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी फॉरवर्ड डेमोक्रेटिक लेबर पार्टी गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. सदानंद  वायंगणकर  यांनी पणजी येथील पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात मुख्य निवडणूक आयोग, गोव्याचे  मुख्य  निवडणूक अधिकारी व सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना  पत्र पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. वायंगणकर म्हणाले, निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनचा  करण्यात आलेल्या वापरामुळे जनतेमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला आहे. या मशिनमध्ये घोळ असल्याने मतांबाबत देखील अनेक उमेदवारांनी संशय व्यक्‍त केला होता. त्यामुळे त्याच्या वापराबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे.

निवडणूक आयोगाने या ईव्हीएम मशिनबाबत  जनतेमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. ईव्हीएमची केवळ 380च्या आसपास उमेदवारांची यादी हाताळण्याची क्षमता आहे. परंतु जर आगामी लोकसभा निवडणुकीत 1हजार हून अधिक उमेदवारांनी निवडणूक लढवली तर हे मशिन ते कसे हाताळणार, असा  प्रश्‍न असून निवडणूक आयोगाने त्याची माहिती द्यावी , असे अ‍ॅड. वायंगणकर यांनी सांगितले.फॉरवर्ड डेमोक्रेटीक लेबर पार्टी गोवाचे  नामदेव चोपडेकर,  विवेक गावकर, दत्तराज केरकर, हरीशचंद्र नाईक, महादेव पटेकर, चांदभाई सय्यद हजर होते.