Fri, Apr 19, 2019 12:12



होमपेज › Goa › गोव्याच्या आठ अधिकार्‍यांची कर्नाटकात ताब्यात घेऊन सुटका

गोव्याच्या आठ अधिकार्‍यांची कर्नाटकात ताब्यात घेऊन सुटका

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AM



पणजी /डिचोली : प्रतिनिधी

कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या कळसा-भंडुरा जल प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गोव्याच्या जलस्रोत खात्याच्या आठ अधिकार्‍यांना  कर्नाटक पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले, असे जलस्रोत खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी 

सांगितले पालयेकर म्हणाले, की जलस्त्रोत खात्याचे आठ अभियंते व अधिकारी   म्हादई नदीचे पाणी अडवलेल्या कणकुंबी गावात गेले असता त्यांना कर्नाटक राज्याच्या पोलिसांनी अटकाव करून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना अनेक प्रश्‍न विचारून आणि त्यांची जबानी नोंद करून त्यांना इशारा देऊन सोडले आहे. या विषयावर आपण राज्याचे प्रधान सचिव पी. कृष्णमूर्ती यांना माहिती दिली असून ते कर्नाटकाच्या सचिवाकडे याबाबत चर्चा करणार आहेत. 

म्हादईच्या लढ्याचा अंतिम निवाडा 20 ऑगस्ट रोजी म्हादई जललवादाकडून अपेक्षित आहे. मात्र, कर्नाटक पोलिसांनी गोव्याच्या अधिकार्‍यांना ताब्यात घेतल्याने पर्यावरण कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. कार्यकारी अभियंता दिनेश महाले  सहाय्यक अभियंता आर.बांदेकर, मादिओ रिबेलो, एम.झेवियर, साईश लवंदे, सुरेश परुळेकर, तृप्‍ती प्रभूगावकर, पूर्वा नाईक यांना पोलिसांनी अडवून कणकुंबी येथील सर्कीट हाऊसमध्ये अर्धातास थोपवून ठेवले.