Sun, Aug 25, 2019 23:27होमपेज › Goa › गोव्याच्या कला-संस्कृती विकासासाठी प्रयत्न

गोव्याच्या कला-संस्कृती विकासासाठी प्रयत्न

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 11:48PMफोंडा : प्रतिनिधी

अंत्रुज महालातील कलाकारांनी विविध कला क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे. त्यामुळेच अंत्रुज महालात संस्कृतीचे संवर्धन झाले आहे. गोव्याच्या कला आणि संस्कृतीच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार, असे आश्‍वासन कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केले.

वरदंबिका कला संघाच्या त्रितपपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या नाट्यमहोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मंत्री गोविंद गावडे बोलत होते. विनायक गावकर, रघुनाथ साकोर्डेकर, उदय डांगी, नागज्योती, अजित केरकर, दामोदर पंचवाडकर, अनिल गावणेकर उपस्थित होते.

मंत्री गोविंद गावडे म्हणाले, की कला व संस्कृती संचालनालयातर्फे गोव्यातील संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कलाकारांचा गौरव केल्याने नवीन कलाकारांना स्फूर्ती मिळते. कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळाल्यास चांगले कलाकार घडण्यास मदत होते. वरदंबिका कला संघाने गेल्या 36 वर्षात अनेक कलाकार घडविले. भावी पिढीपर्यंत संस्कृती पोचविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्धल प्रत्येकजण कौतुकास पात्र आहे. यावेळी खास त्रितपपूर्ती निमित्त काढलेल्या स्मरणिकेचे अनावरण व स्त्री कलाकार गौरी कामत यांचा गौरव मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते करण्यात आला. रघुनाथ साकोर्डेकर यांनी स्वागत केले. अवधूत कामत यांनी आभार मानले. 

Tags : Efforts to develop the arts-culture of Goa