Mon, Jun 01, 2020 08:32होमपेज › Goa › बनावट पोर्तुगीज नागरिकत्व देणार्‍या चौघांना लिस्बनमध्ये शिक्षा

बनावट पोर्तुगीज नागरिकत्व देणार्‍या चौघांना लिस्बनमध्ये शिक्षा

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 20 2017 11:55PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

बनावट दस्तऐवजांच्या आधारे पोर्तुगीज नागरिकत्व मिळवून दिल्याप्रकरणी  आंतरराष्ट्रीय टोळीतील चौघांना लिस्बनमध्ये (पोर्तुगाल) 3 ते 6 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.  या टोळीत दोघे भारतीय तर अन्य दोघे मोझांबिकचे नागरिक आहेत. 

या चौघांना पकडण्यासाठी पोर्तुगाल पोलिसांनी चार वर्षांपासून सापळा लावून ठेवला होता. पोलिसांनी भारत, पोर्तुगाल, इग्लंड, गिनीया, सेनेगल, मोझांबिक आदी राष्ट्रांत पाहणी केली होती. पोलिसांनी अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमुळेे या चार जणांच्या टोळीला पकडण्यात यश आले आहे.  या टोळीने अनेक गोमंतकीयांची  फसवणूक केली असून बनावट पासपोर्ट व कागदपत्रांच्या साहाय्याने पोर्तुगीज नागरिकत्व मिळवून दिल्याचा पोलिसांना सशंय आहे. यामुळे आता पोतुर्गीज नागरिकत्व मिळालेले अनेक गोमंतकीयही पोलिसांच्या ‘रडार’वर असून त्यांचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

या टोळीने अनेकांकडून प्रत्येकी 30 हजार युरो उकळले तसेच अर्जदारांच्या कुटुंबीयांनाही बनावट पासपोर्ट मिळवून दिल्याचे या प्रकरणाने उघड झाले आहे. 

गोव्यातील विदेश व्यवहार विभागातून तसेच गृह खात्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यातील सुमारे दहा हजार लोक दरवर्षी पोर्तुगीज पासपोर्ट घेत असतात.  

पोर्तुगीज पासपोर्टमुळे युरोपीय राष्ट्रात प्रवेश सुकर

जी गोमंतकीय व्यक्‍ती 1961 पूर्वी जन्मलेली असेल ती  या पासपोर्टसाठी अर्ज करू शकते. पोर्तुगीज पासपोर्ट मिळवल्यानंतर युरोपीय महासंघात येणार्‍या सर्व राष्ट्रांत प्रवेश करणे सोपे जाते. याच संधीचा लाभ घेण्यासाठी पोर्तुगीज पासपोर्ट मिळवण्याकडे  कल असतो.  युरोपीय राष्ट्रांत बेकारी भत्ता म्हणून गलेलठ्ठ रक्‍कम मिळत असल्याने पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन युरोपात जाणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे.