Mon, Aug 19, 2019 07:27होमपेज › Goa › दिगंबर कामत, आलेमाव विरोधात ‘ईडी’ची तक्रार

दिगंबर कामत, आलेमाव विरोधात ‘ईडी’ची तक्रार

Published On: Jul 22 2018 1:02AM | Last Updated: Jul 21 2018 11:54PMपणजी : प्रतिनिधी

जायका लाचखोरीप्रकरणी (ईडी) अंमलबजावणी संचालनालयाने आमदार तथा तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत व तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या विरोधात मनी-लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष न्यायालयात  तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रार ही आरोपपत्रासमान असल्याचे संचालनालयाने नमूद केले आहे. कामत व आलेमाव यांना समन्स बजावून 28 ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगण्यात आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. 

गोव्यातील जायका प्रकल्पाचे कंत्राट लुईस बर्जर या कंपनीला देण्यासाठी 2010 साली लाच घेतल्याचा आरोप कामत व आलेमाव यांच्यावर आहे. त्यानंतर 2015 साली प्रकरण उघडकीस  आल्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता.  अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गतदेखील गुन्हा नोंदवला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने कामत व आलेमाव यांची 1.95 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्‍त केली होती.