Fri, Mar 22, 2019 01:28
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › ‘पोर्टल’मुळे राज्यातील युवकांना रोजगार संधी

‘पोर्टल’मुळे राज्यातील युवकांना रोजगार संधी

Published On: Jul 05 2018 1:37AM | Last Updated: Jul 05 2018 12:21AMपणजी : प्रतिनिधी

राज्यासोबत देशातील रोजगार क्षेत्रातील सर्व घटकांना एकाच व्यासपीठावर आणणार्‍या  ‘पोर्टल’मुळे गोमंतकीय युवकांना राज्यात व देशपातळीवरील रोजगारांच्या विविध संधी खुल्या होणार आहेत. राज्यातील उद्योजक, कामगार, बेरोजगार आणि रोजगारप्राप्त युवकांचा नेमका आकडा समजणार आहे, असे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले.

पर्वरी येथील मंत्रालयाच्या सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात ‘राष्ट्रीय कारकिर्द सेवा’ (एनसीआर) पोर्टलचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
पर्रीकर म्हणाले, की पोर्टलमुळे सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील सर्व घटकांना आपल्या हव्या त्या पात्र उमेदवारांचा शोध घेणे सोपे जाणार आहे. देशभरातील सुमारे 53 विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधीही एकाच स्थानावर मिळणार असल्याने बेरोजगारांना पर्याय उपलब्ध होणार आहेत. मंत्री खंवटे म्हणाले, की राज्यातील सुशिक्षीत व कमी शिक्षितांना देखील रोजगारांच्या संधी प्राप्त होणार आहेत. या पोर्टलमुळे राज्यातील प्रतिभावान युवकांना संधीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करणार आहे. 

 उत्तर गोवा जिल्हाधिकारी निला मोहनन, कामगार आयुक्त जयंत तारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.