Thu, Apr 25, 2019 07:26होमपेज › Goa › १६ हजार खाण अवलंबित कुटुंबे एका रात्रीत रस्त्यावर 

१६ हजार खाण अवलंबित कुटुंबे एका रात्रीत रस्त्यावर 

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 16 2018 12:30AMमडगाव : प्रतिनिधी 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2013 नंतर दुसर्‍यांदा म्हणजेच गुरूवार दि.15 मार्चच्या संध्याकाळपासून खाणबंदी लागू झाल्याने खाण आणि निगडीत व्यवसायावर अवलंबून असलेली दक्षिण गोव्यातील तब्बल 16 हजार कुटुंबे एका रात्रीत रस्त्यावर आली आहेत. 

खाणबंदी लागू झाल्याने गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शेवटची खनिज वाहतूक करण्यात आली, या नंतर कधी खाण व्यवसाय सुरू होणार आहे याची कोणालाच कल्पना नाही, व्यवसाय सुरू झाला तरी तो कोणाच्या नियंत्रणात असेल,बाहेरचे खाण मालक पुन्हा आम्हाला नोकरीत सामावून घेतील काय, खाण सुरू होईपर्यंत सरकार आर्थिक दृष्ट्या सहकार्य करणार का, बँकांकडून  घेतलेल्या कर्जाचे हप्‍ते कसे फेडणार, या व्यवसायाच्या आधारावर उच्च शिक्षणासाठी परराज्यात पाठवलेल्या मुलांचे पुढे काय होणार, अशा अनेक प्रश्‍नांचे वादळ खाण व्यवसायावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या मनात उठलेले आहे.

खाणबंदीचा निर्णय एका महिन्यापूर्वी जाहीर झाला ही 2013 सालच्या घटनेची पुनरावृत्ती होती.लोकांना पार्याय निवडायला वेळ मिळाला नाही. हातावर पोट असलेले पर्यायी व्यवसाय निवडावा, की खाणबंदीची तारीख जवळ येईपर्यंत खाणींवरच जोमाने काम करावे ,या दंद्वात सापडले.परिणामी गुरुवारी सर्व खनिज कंपन्यांनी हळूहळू वाहतूक संपवत स्वतःहून बंदी आमलात आणली आणि लोकांना पुढील खडतर वाटचालीची कल्पना करून दिली.