Tue, Jul 16, 2019 09:36होमपेज › Goa › चांगल्या सिनेनिर्मितीचे स्वप्न पाहा : ऐटम इगोयन 

चांगल्या सिनेनिर्मितीचे स्वप्न पाहा : ऐटम इगोयन 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

कलाकाराला भूमिकेशी जोडायचे काम दिग्दर्शकाचे असते. दिग्दर्शकाला भूमिकेच्या भावना नटापर्यंत पोहचवून ती भूमिका अचूक करून घेता यायला हवी. चांगले चित्रपट बनवायचे असतील तर दिग्दर्शकाने स्वप्न पाहणे महत्वाचे असून चित्रपट फक्त भाषेतूनच नाही तर भावनांमधूनही प्रेक्षकांपर्यंत पोहचविता आला पाहिजे,असे मत चित्रपट निर्माते एटम इगोयन यांनी व्यक्त केले. 

इफ्फी त ‘मेकिंग ड्रामा’ या विषयावर आयोजित मास्टरक्‍लास मध्ये ऐटम इगोयन बोलत होते. यावेळी  त्यांनी स्वतः दिग्दर्शित ‘द कॅप्टीव्ह’ व ‘क्‍लोवी’ या चित्रपटातील काही घटना प्रेक्षकांना दाखविल्या. त्या चित्रपटातील भूमिकांवर आपणकशाप्रकारे अभ्यास केला याची माहिती ऐटम यांनी दिली. 

एटम म्हणाले, चित्रपटातून स्पष्ट होणार्‍या प्रभावी भावना प्रेक्षकांच्या मनात चित्रपट रुजवायला मदत करतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे चित्रपट बनविणे फार सोपे झाले असले तरीही चित्रपट निर्मात्याची सर्जनशीलता कायम चित्रपटाला अत्युच्च शिखर गाठायला मदत करते. 

चित्रपट दिग्दर्शकाला आपल्या आजूबाजूला घडणार्‍या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. याच बारीकसारीक गोष्टी काही वेळा चांगला दृष्य मिळवायला हातभार लावतात. एका सेकंद चा दृष्य  देखील पाहणार्‍याला हसवू किंवा रडवू शकतो. त्यामुळे प्रत्येक दृष्य समान महत्वाचे  असतेे. 

चित्रपट निर्मितीसाठी पैसे नसताना कमीतकमी बजेट मध्ये चित्रपट बनवायला शिकलो. त्यानंतर आता कुठे मनाजोगा चित्रपट बनवायला मिळते. या परिस्थितीतूनच शिकून माणूस चित्रपटाच्या आणखी जवळ जातो. आपले जास्तीतजास्त चित्रपट हे कमी बजेटचे झाले. परंतु यातूनही चित्रपट बनविण्यातील काही प्रतिक्रियांतून आपण खूप काही शिकलो,असे एटम यांनी मान्य केले.