Wed, Jul 17, 2019 18:01होमपेज › Goa › डॉ. व्यंकटेश आर. यांची जामिनासाठी न्यायालयात धाव

डॉ. व्यंकटेश आर. यांची जामिनासाठी न्यायालयात धाव

Published On: May 26 2018 1:50AM | Last Updated: May 26 2018 12:10AMपणजी : प्रतिनिधी  

आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी यांच्यावरील हल्ला प्रकरणातील संशयित डॉ. व्यंकटेश आर. यांनी जामिनासाठी पणजी न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली. संशयित डॉ. व्यंकटेश आर.  बांबोळी येथील  गोमेकॉ इस्पितळात उपचार घेत आहेत. 

प्रलंबित बिलांच्या विषयावरून गुरुवारी आरोग्य खात्याचे संचालक संजीव दळवी यांच्यावर संशयित व्यंकटेश आर. या खासगी डॉक्टरने लोखंडी रॉडने (स्पॅनर) हल्ला  केला होता. या हल्ल्यात डॉ. दळवी जखमी झाले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना संशयित  डॉ. व्यंकटेश हेही जखमी झाले होते.  व्यंकटेश आर.खासगी डॉक्टर असून मडगाव येथील हॉस्पिसिओ इस्पितळात डायलेसिस विभाग चालवतात. याप्रकरणी पणजी पोलिसांकडून साक्षीदारांची जबानी नोंदवण्यात येत असून पुढील तपास केला जात आहे.