Fri, Jul 19, 2019 05:42होमपेज › Goa › राज्यातील भाजप सरकार बरखास्त करा

राज्यातील भाजप सरकार बरखास्त करा

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 14 2018 11:37PMपणजी: प्रतिनिधी

भारतीय तटरक्षक दलाने  जारी केलेला  दहशतवादी हल्ल्याविषयीच्या अर्लट राहण्याकडे  दुर्लक्ष  केल्याबाबत राज्यातील भाजप सरकार बरखास्त करा, अशी मागणी  काँग्रेसचे केंद्रीय सचिव  गिरीश चोडणकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.सदर अर्लट गांभीर्याने   का घेण्यात आला नाही,  सदर अर्लट म्हणजे सागर कवच असे सांगून जनतेची दिशाभूल केली.   या मुद्यावर  राष्ट्रीय तपासयंत्रणेने (एनआयए) ने  गोवा पोलिसांना नोटीस बजावून त्यांच्याकडून  स्पष्टीकरण मागावे अशी  मागणीही  चोडणकर यांनी केली.

भारतीय तटरक्षक दलाने   मागील आठवडयात  गोव्यासहीत, महाराष्ट्र, गुजरात व केरळ  या किनारपट्टी राज्यांना   दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्‍त करुन  खबरदारी म्हणून   अर्लट  राहण्याचा आदेश जारी केला होता. मात्र गोव्याने हा अर्लट  आदेश गांभिर्याने घेतला नाही, असा आरोप  चोडणकर यांनी केला.या अर्लटच्या पार्श्‍वभूमीवर  महाराष्ट्र,गुजरात व केरळ पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतली. मात्र  गोवा पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सदर अर्लट म्हणजे   सागर कवच  मोहीम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सदर प्रकार म्हणजे गंभीर  राष्ट्रीय मुद्दा आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थित  गृह खाते दिशाहीन बनले आहे. त्यामुळे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी हे  सरकार बरखास्त  करावे अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री पर्रीकर  उपचारासाठी राज्याबाहेर असल्याने काँग्रेस पक्ष गप्प होते. मात्र आता स्थिती गंभीर बनली  असून पोलिसांकडून दहशतवादी अर्लटकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे   नेते उर्फान मुल्‍ला उपस्थित होते. 

Tags : Goa, Dismiss, BJP, government,  state