Tue, Jul 16, 2019 09:41होमपेज › Goa › सरकारी खात्यांतील व्यवहार १ ऑक्टोबरपासून डिजिटल 

सरकारी खात्यांतील व्यवहार १ ऑक्टोबरपासून डिजिटल 

Published On: Jan 31 2018 12:16AM | Last Updated: Jan 31 2018 12:03AMपणजी : प्रतिनिधी

सर्व सरकारी कार्यालयांत रोखीने व्यवहार  करणे बंद  केले जाणार असून, 1 ऑक्टोबर 2018 पासून डिजिटल व्यवहार केला जाणार आहे. शासकीय प्रशासनात 100 टक्के व्यवहार डिजिटल करण्याच्या दिशेने हे पाऊल टाकले जाणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. 

येथील राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारी खात्यात रोख व्यवहारामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळत असून रोखीने व्यवहार  बंद करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व खात्यांत डिजिटल यंत्रे बसवण्यात येणार असून एकदा हे काम पूर्ण झाल्यावर रोकड स्वीकारली जाणार नाही. 

भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही योजना उपयुक्‍त ठरणार आहे. राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा तसेच नाबार्ड- गोवा शाखेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

कृषी क्षेत्रात 6 टक्के वाढीचे ध्येय : पर्रीकर

राज्यातील शेतकर्‍यांचे उत्पन्‍न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केले जात असून कृषी क्षेत्रात 6 टक्के वाढ करण्याचे सरकारचे ध्येय आहे. 2011-12 साली फक्‍त 4 टक्के असलेली वाढ यंदाच्या आर्थिक वर्षात ही वाढ 5 टक्के झाली आहे. जर ही वाढ 6 टक्क्यांवर पोहोचली तर राज्य सरकारसाठी ती अभिमानास्पद कामगिरी होणार आहे.