Mon, May 20, 2019 20:49होमपेज › Goa › दिगंबर कामत यांची दोन तास चौकशी

दिगंबर कामत यांची दोन तास चौकशी

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 11:06PMपणजी : प्रतिनिधी  

राज्यातील खाण घोटाळाप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथका  (एसआयटी) समोर  सोमवारी  मडगावचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत  हजर राहिले.त्यांची सुमारे एक तास कसून चौकशी करण्यात आली. प्रसंगी त्यांना पुन्हा   बोलावण्यात येईल, असे यावेळी एसआयटी सूत्रांनी सांगितले.कामत यांना मागील आठवड्यात समन्स बजावून  एसआयटी कार्यालयात सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार कामत  सोमवारी सकाळी रायबंदर येथील एसआयटी कार्यालयात चौकशीस आले.  

राज्यातील कथित 35 हजार कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्याचा तपास एसआयटीकडून  केला जात आहे.  या प्रकरणी कामत यांची यापूर्वीदेखील कसून चौकशी करण्यात आली आहे. खाण घोटाळा झाला तेव्हा कामत हे 2007 ते 2012 या कालावधीत मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर कामत हे खाण मंत्रीदेखील होते. त्यांच्याच  कार्यकाळात हा खाण घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे  मुख्यमंत्री तथा खाणमंत्री या नात्याने  खाणी संदर्भात घेतलेल्या निर्णयांसंबंधी कामत यांची  एसआयटीकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती एसआयटी सूत्रांनी दिली. कामत  यांनी या प्रकरणी  अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून त्यांना अंतरीम दिलासा मिळाला आहे. 


गोविंदराज धेम्पो यांना समन्स

 खाण घोटाळ्याचा तपास करणार्‍या एसआयटीने   माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे जावई गोविंदराज धेम्पो यांना  समन्स बजावले आहे.   त्यांना  सोमवार  दि.7 मे रोजी चौकशीस हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. बनावट कंपन्यांच्या  बँक खात्यांचा  विदेशी बँक खात्यांशी असलेल्या संबंधाबाबत ही चौकशी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Tags : Goa, Digambar Kamat,  interrogated,  two, hours