Wed, Jan 23, 2019 13:23



होमपेज › Goa › दिगंबर कामत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे

दिगंबर कामत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे

Published On: Dec 17 2017 1:42AM | Last Updated: Dec 17 2017 1:37AM

बुकमार्क करा





पणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाण घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पणजीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेला  अटकपूर्व जामीन अर्ज शनिवारी (दि. 16) मागे घेतला.  त्यामुळे पणजी सत्र न्यायालयाने सदर अर्ज निकाली काढला. 

अटक करायची झाल्यास 48 तास आधी नोटिसीद्वारे कळवण्यात येईल, अशी माहिती गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी)  न्यायालयात दिल्यानंतर  कामत यांनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला.

खाण घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री कामत यांनी पणजी न्यायालयात  अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. या याचिकेवर  11  डिसेंबर रोजी सरकारी वकिलांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला होता. कामत यांच्या अटकपूर्व जामिनाला  एसआयटीच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. कामत यांचे वकील  शनिवार दि. 16 पासून युक्तिवादास सुरुवात करणार होते. मात्र, अटक करण्यापूर्वी 48 तास आधी कामत यांना कळवण्यात येईल, असे एसआयटीने  न्यायालयात सांगितल्याने कामत यांनी  त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला.