Sun, Aug 25, 2019 23:26होमपेज › Goa › न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन नाही

न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन नाही

Published On: Jan 16 2018 2:29AM | Last Updated: Jan 16 2018 2:28AM

बुकमार्क करा
डिचोली : प्रतिनिधी 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पूर्ण पालन कर्नाटकाने केलेले असून गोवा सरकार कर्नाटकाशी महानाटक खेळत आहे. आमच्या राज्यात सुरू असलेले काम पाहण्यासाठी कसल्याही शिष्टाचाराचे पालन न करता जलस्रोतमंत्री पालयेकर कसे काय येतात, असा सवाल  कर्नाटकाचे जलस्रोत मंत्री एम. बी. पाटील यांनी सोमवारी कणकुंबी येथे कळसा कालव्याच्या भेटीप्रसंगी केला, व गोव्याचे मुख्यमंत्री व जलस्रोेत मंत्र्यांवर टीका केली.  

कर्नाटकचे जलस्रोतमंत्री एम. बी. पाटील, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांच्यासमवेत सुमारे 200 नागरिकांनी सकाळी कणकुंबीत कळसा कालव्याच्या ठिकाणी भेट दिली व कामाची पाहणी केली. गोवा सरकार आमच्याबरोबर खोटारडेपणा करत असून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना डावलून राजकीय लाभासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांना  पत्र पाठवल्याची टीका पाटील यांनी केली.