Wed, Apr 24, 2019 11:46होमपेज › Goa › सर्वण येथे कारचालक ठार

सर्वण येथे कारचालक ठार

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 07 2018 1:40AMडिचोली ; प्रतिनिधी 

सर्वण डिचोली येथे दुपारी 3.30 वा. च्या सुमारास कारची कदंब बसला धडक बसून कारने पेट घेतल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिजीत सिंदुरे (वय 46, रा.साखळी) या  कारचालकाचा गोमेकॉ इस्पितळात उपचारावेळी मृत्यू झाला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए-03-एक्स0288 ही साखळीहून डिचोलीकडे येणारी कदंब बस सर्वण येथे आली असता समोरून     

येणार्‍या (जीए-04 सी 3530) कारने बसला धडक दिली. या धडकेसरशी कार बाजूला फेकली गेली व स्फोट होऊन कारने पेट घेतला. यावेळी कारचालक अभिजीत सिंधुरे याला तातडीने कारमधून येथील लोकांनी बाहेर काढले. त्याला गंभीर स्थितीत प्रारंभी डिचोली इस्पितळात नंतर तेथून गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातात कारमधील कुत्राही गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. 

अपघाताची माहिती मिळताच अग्‍निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र कार पूर्ण जळाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी डिचोली पोलिस निरीक्षक  संजीव दळवी, लक्ष्मी घाडी व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
 

 

tags :  Dicholi,news,sarvaran, Dicholi ,Car, bus, accident,