Fri, Aug 23, 2019 21:47होमपेज › Goa › पंचायतींनी विकासाला चालना द्यावी 

पंचायतींनी विकासाला चालना द्यावी 

Published On: Feb 19 2018 1:24AM | Last Updated: Feb 19 2018 1:10AMडिचोली : प्रतिनिधी

  प्रत्येक   पंचायत   भागाचा विकास करण्यासाठी सरकार सर्व योजनांना चालना देत आहे.  ग्रामपंचायतींनी विकासाच्या अनेक योजना  तयार  करून त्या मंजुरीसाठी सरकारकडे पाठवाव्यात. द्रीय योजनांचा निधी परत पाठवावा लागतो,  असे होऊ नये यासाठी  पंचायत मंडळांनी नव्या योजना आखून विकासाला चालना द्यावी, सरकार सर्व ती मदत करण्यास तयार आहे, असे   प्रतिपादन पंचायत मंत्री माविन  गुदिन्हो यांनी केले.   

 शिरगाव  पंचायत  क्षेत्रात   सुमारे 37 लाख  रुपये खर्चकरून  उभारण्यात आलेल्या समाज मंदिराच्या  उदघाटन  प्रसंगी मंत्री गुदिन्हो बोलत होते.   आमदार  प्रवीण झांट्ये,  सरपंच सदानंद गावकर, देवस्थान अध्यक्ष यदुवीर गावकर,  अच्युत गावकर, कल्पिता घाडी, भगवान गावकर, विजया  मांद्रेकर  उपस्थित होत्या.  पंचायत विभागातील स्वच्छता  राखण्यासाठी सरकारने 2 लाख रुपये निधी मंजूर केला असून सर्व निधीमध्ये वाढ केली आहे. पंचायत सदस्याचे  वेतनात  50 टक्के वाढ केली असून हे वेतन एप्रिलपासून लागू  होणार आहे.  गावातील नागरिकांनी हरित क्रांती बरोबरच धवलक्रांतीला सहकार्य करून दूध उत्पादन वाढवण्यासाठी युवकांनी पुढे . युवकांना  सरकार सर्वप्रकारची मदत  करण्यास  तयार  असल्याचे  मंत्री  गुदिन्हो यांनी सांगितले . 

आमदार   झांट्ये  म्हणाले, की   गावात  विविध विकास कामे करण्यासाठी पंचायत  सदस्यांनी  पुढाकार घेतला पाहिजे. सरकारकडून मिळणारा निधी आपल्या गावात जास्तीत जास्त कसा उपलब्ध करता येईल यासाठी विकास कामे आखावीत.  विकास कामांना सरकारचे सहकार्य मिळेल. शिरगावातील  अनेक योजना   जत्रेपूर्वी पूर्ण केल्या जातील.  समाज मंदिराचा  वापर गावातील विविध सेवा भावी कार्यक्रमांसाठी करावा.   गावातील युवकांना केंद्र बिंदू मानून  उपक्रम हाती  घ्यावेत.   

सरपंच सदानंद गावकर म्हणाले, की शिरगावामध्ये सरकारच्या अनेक योजना अजून राबवायच्या आहेत.   पंचायत मंडळ गावाच्या विकासासाठी  कार्यरत असून अनेक योजना आखलेल्या आहेत, त्या पूर्णत्वास नेण्यासाठी मंत्री   गुदिन्हो यांनी सहकार्य करावे.   तसेच गावातील जनतेच्या  सोयीसाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. उपक्रम पूर्ण करण्यासाठी जनतेने सहकार्य तेवढेच महत्त्वाचे आहे. मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते   समाज मंदिराचे   उदघाटन करण्यात आले. अच्युत गावकर यांनी  सूत्रसंचालन केले.  भगवंत गावकर यांनी आभार मानले.