Thu, Jun 04, 2020 04:12होमपेज › Goa › शेती विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज

शेती विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज

Published On: Jan 02 2018 12:59AM | Last Updated: Jan 02 2018 12:14AM

बुकमार्क करा
डिचोली ः प्रतिनिधी 

राज्यातील कृषी क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी पारंपरिक साधनाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. सेद्रींय खताचा वापर करून शेतीला चालना दिली राज्याला हरितक्रांतीत मोठे यश मिळेल, असे प्रतिपादन मांगिरिष पै रायकर यांनी केले.  मये पंचायतन सभागृहात जागतिक कृषीदिन कार्यक्रम व शेतकर्‍यांच्या सत्काराप्रसंगी पै रायकर बोलत होते. व्यासपीठावर सरपंच विश्‍वास चोडणकर, जिल्हा पंचायत अध्यक्षा अंकिता न्हावेलकर, झुआरी कंपनीचे मुख्य अधिकारी आर.एस.चुसकर दिनकर तेंडुलकर, चोडणकर, कृषी अधिकारी प्रदीप मळीक, प्रेमानंद म्हाबरे आदी उपस्थित होते. शेतकरी बाळासाहेब राणे विश्‍वास चोडणकर, प्रेमानंद म्हाबरे यांचा आदर्श शेतकरी म्हणून सत्कार करण्यात आला.

 प्रदीक मळीक यांनी सांगितले, की शेतकर्‍यांनी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उत्पादन क्षमता वाढवण्याची आवश्यता आहे. विविध प्रकारांची पिके घेण्यासाठी शेतकर्‍यांरी सतत कार्यरत रहावे. तसेच नवीन तंत्रज्ञान व सेद्रींय शेती करण्यावर भर द्यावा. झुवारी कंपनीचे अधिकारी चुसकर यांनी सांगितले, की शेतात नवनवे प्रयोग करताना रासायनिक खताबरोबरच सेंद्रीय खतांचा योग्य वापर करुन चांगले उत्पादन घेण्याची आवश्यकता आहे. प्रेमानंद म्हांवरे, विश्‍वास चोडणकर यांनी सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सरकारच्या सहकार्यातून अनेक योजनांचा लाभ शेतकर्‍यांना मिळत असल्याचे स्पष्ट केले. अंकिता न्हावेलकर, शंकर चोडणकर आदींनी मार्गदर्शन केले. स्वागत प्रदीप मंदार सावईकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.