Tue, Nov 13, 2018 02:21होमपेज › Goa › डिचोलीत गोवा सुरक्षा मंचची निदर्शने 

डिचोलीत गोवा सुरक्षा मंचची निदर्शने 

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 1:34AM

बुकमार्क करा
डिचोली ः प्रतिनिधी 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकला पिण्याचे पाणी देण्यासंदर्भात घेतलेल्या द्विपक्षीय चर्चेच्या भूमिकेविरोधात गोवा सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी डिचोली येथील शांतादुर्गा हायस्कूलसमोर निदर्शने करून घोषणाबाजी केली. यावेळी आनंद शिरोडकर, नारायण बेतकीकर, आत्माराम गावकर, उल्हास केरकर, रामदास भगत, दामोदर नाईक, तेजस काणेकर, सुनील पिळगावकर, शैलेश जाधव, भोलानाथ गाड, हर्षद देवरी, भीमराव देसाई नाईक, शिरोडकर व सुमारे 20 कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी म्हादई वाचवा, गोवा वाचवा, अशा घोषणा देण्यात आल्या  यावेळी आत्माराम गावकर, नारायण बेतकीकर, दामोदर नाईक, हर्षद देवरी यांनी म्हादईप्रकरणी जल लवादाकडे सुनावणी चालू असून यात हस्तक्षेप करण्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.