Sun, May 26, 2019 00:36होमपेज › Goa › विर्डी आमोणा पुलाचे 26 रोजी उद्घाटन 

विर्डी आमोणा पुलाचे 26 रोजी उद्घाटन 

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 12:41AMडिचोली : प्रतिनिधी 

साखळी मतदारसंघातील  विर्डी  आमोणा पुलाचे काम पूर्ण झाले असून   26 जानेवारीला दुपारी 3 वा. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सावंत यांनी सांगितले, की   वरील पुलाचे काम काही वर्षे रखडले होते. विर्डी  व आमोणा परिसरातील मालकी वाद न्यायालयात गेल्याने हे काम थांबले होते. आता सर्व गोष्टी मार्गी लागल्या असून या भागातील अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. सदर  पुलामुळे या भागातील नागरिकांना पणजी व इतर  भागातील अंतर कमी होणार  आहे.  पुलाला जो जोड रस्ता आहे त्याची व्यवस्था चांगली करण्यासाठी संबंधित कंपनीबरोबर  बोलणी करण्यात येत आहे.

दरम्यान, पिळगाव कारापूर विर्डी  पुलाचे कामाची आखणी करण्यात आलेली असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे, असेही प्रमोद सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  राज्यातील अनेक पुलांची कामे मार्गी लावली आहेत. पुलाच्या जोडणीतून गावे व गावातील जनतेची मने जोडण्याचे काम केले आहे.  त्यामुळे भावनिक नातेही वृद्धिंगत होण्यास मदत झाली. 26 जानेवारी दुपारी 3 वाजता हा उद्घाटन सोहळा होणार आहे. या भागातील जनतेचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे.  या पुलाचा लाभ साखळीतील अनेक लोकांना होणार आहे. साखळीतील होणार्‍या पुढील विकासकामांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.