Sat, Apr 20, 2019 08:06होमपेज › Goa › ‘धूम स्टाईल’ने युवकाचा बळी

‘धूम स्टाईल’ने युवकाचा बळी

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 03 2018 11:50PMदाबोळी : प्रतिनिधी

चिखली-दाबोळी विमानतळ मार्गावर दुसर्‍या दुचाकीला ‘धूम स्टाईल’ने मागे टाकण्याच्या नादात गाडीवरील ताबा जाऊन दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या सोहेल खान (वय 18, रा.ब यणा) या युवकाचा मृत्यू झाला तर दुचाकीचालक शबीद खान हा गंभीर जखमी झाला.सदर अपघात मंगळवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शबीद खान व सोहेल खान हे युवक चिखली-विमानतळ मार्गावरून केटीएम (जीए 06, आर 8683) दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या एका दुचाकीला धूम स्टाईल मागे टाकण्याच्या नादात शबीदचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या सोहेल खानच्या तोंडाला व डोक्याला जबर मार बसला तर शबीद खान याच्याही डोक्याला मार बसला. दोघांनाही गंभीर अवस्थेत चिखली कुटीर रूग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सोहेल खान याला मृत घोषित केले. शबीदवर उपचार सुरू आहेत.