Sat, Apr 20, 2019 23:53होमपेज › Goa › विकासाची गती भविष्यातही कायम राहील : मुख्यमंत्री

विकासाची गती भविष्यातही कायम राहील : मुख्यमंत्री

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 31 2018 12:12AMपणजी : प्रतिनिधी

मागील 31 वर्षांत विकासाचा गाठलेला वेग भविष्यातही कायम राहण्यासाठी जनतेच्या सहकार्याची राज्याला गरज असून, ते यापुढेही मिळेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेहून पाठवलेल्या व्हिडीओ संदेशात व्यक्‍त केला आहे. 31व्या घटक राज्यदिनी पर्रीकर यांनी गोमंतकीय जनतेला कोकणीतून संदेश दिला. या संदेशात ते म्हणतात, की सर्व गोमंतकीय जनतेला 31व्या घटक राज्य दिनानिमित्त आपण शुभेच्छा देत आहे. घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर मागील 31 वर्षे राज्याने विकासात भरारी मारली आहे.     

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे केंद्राने मागील चार वर्षांत अनेक विकासकामे राज्यात यशस्वीरीत्या राबविली आहेत. मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाचे तसेच गालजीबाग- तळपण पूलाचे काम अंतिम टप्प्यात असून झुवारी पुलाचे काम वेगाने सुरू आहे.  सामाजिक क्षेत्रातही अनेक  योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. युवकांना  माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राद्वारे राज्यात रोजगारांची संधी देण्यास राज्य सरकार प्रयत्नशील आहे.   जनतेच्या सहकार्याबद्दल आपल्याला विश्‍वास  आहे. जय हिंद, जय गोवा.