Wed, Mar 27, 2019 00:20होमपेज › Goa › नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाने राज्याचा विकास 

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाने राज्याचा विकास 

Published On: Dec 30 2017 12:35AM | Last Updated: Dec 29 2017 10:38PM

बुकमार्क करा
एकोशी  : वार्ताहर

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या समझोता करारासंदर्भात काही लोक नको त्या गोष्टी सांगून लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. समझोता करारामुळे राज्याचा विकास होईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी केले.

पेन्ह द फ्रांक पंचायतीतर्फे गोवा मुक्ती दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री खंवटे बोलत होते. व्यासपीठावर पेन्ह द फ्रांक चर्चचे फादर मॅथ्यू फर्नांडिस, जिल्हा पंचायत सदस्यस्य गुपेश नाईक, साल्वादोर द मुंद पंचायतीचे सरपंच संदीप साळगावकर, पेन्ह द फ्रांकचे सरपंच स्वप्नील चोडणकर व पंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गुपेश नाईक, सात्वादोर द मुंदचे सदस्य सरपंच संदीप साळगावकर यांची भाषणे झाली. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कतृत्वान व्यक्तींचा सत्कार व शिक्षण क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.