Wed, Jul 17, 2019 20:24होमपेज › Goa › ‘लाईफ टाईम’च्या माध्यमातून सिंधुदुर्गचा विकास

‘लाईफ टाईम’च्या माध्यमातून सिंधुदुर्गचा विकास

Published On: May 28 2018 1:44AM | Last Updated: May 27 2018 11:50PMपडवे : विशेष प्रतिनिधी

नारायण राणे यांच्यासारखा दूरदृष्टी व व्हिजन असलेला नेता नाही. त्यांनी उभारलेल्या या लाईफटाईम हॉस्पिटलची भव्यता फार मोठी आहे. ते राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल व वैद्यकिय महाविद्यालय प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुधारेल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होईल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. 

केंद्र व राज्य सरकारच्या रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या योजना आणि नारायण राणे यांनी हे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह उभारलेले हॉस्पिटल त्यामुळे रुग्णांवर चांगले उपचार होऊन ते ठणठणीत बरे होतील. गरीब, गरजू रुग्णांना चांगल्या उपचाराअभावी मृत्युला सामोरे जावे लागणार नाही, असा विश्वासही  फडणवीस यांनी व्यक्त केला.माजी मुख्यमंत्री  तथा खा.नारायण राणे यांनी अथक प्रयत्नाने कसाल-पडवे येथे उभारलेल्या जागतिक दर्जाच्या सुपरस्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटलचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय नेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या इस्पितळातील यंत्रसामुग्री पाहिल्यानंतर नारायण राणे यांनी हे हॉस्पिटल उभारताना प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीचाही विचार केल्याचे दिसते आहे, असेही उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.फडणवीस म्हणाले, किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना वारंवार डायलिसीस करावे लागते. त्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो. लाईफटाईममध्ये यासाठी आधुनिक व्यवस्था असूनही केवळ 350 रुपयांत डायलिसीस होणार आहे. डायलिसीस करताना काही रुग्णालयांत एड्सच्या रुग्णांना प्रवेश दिला जात नाही. परंतु याठिकाणी अशा रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, गोव्याचे मंत्री जयेश साळगावकर, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा निलम राणे, उपाध्यक्ष माजी खासदार निलेश राणे, सचिव आमदार नितेश राणे, माजी केंद्रीय कायदामंत्री अ‍ॅड.रमाकांत खलप, माजी मंत्री सुनील तटकरे, आ.अनिकेत तटकरे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, जि.प.अध्यक्षा रेश्मा सावंत, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, डॉ.मिलींद कुलकर्णी यांच्यासह विविध भागांतील वैद्यकीय तज्ञ, स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. नारायण राणे, माजी खा.निलेश राणे, आ. नितेश राणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन ऋषी देसाई यांनी केले.