Mon, Jan 21, 2019 04:43होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकरांच्या आजारपणामुळे खाणबंदीवर उपायास उशीर : तेंडुलकर

मुख्यमंत्री पर्रीकरांच्या आजारपणामुळे खाणबंदीवर उपायास उशीर : तेंडुलकर

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 19 2018 1:46AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आजारपणामुळे खाणबंदीवर उपाययोजना करण्यास सरकारकडून काहीसा उशीर झाला असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले. 

भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेंडुलकर म्हणाले, की  सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी रोजी निवाडा दिला असला तरी त्यावर तोडगा काढण्यास सरकारकडून उशीर झाला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खाण पट्ट्यातील आमदार तसेच खाण अवलंबित अन्य घटकांशी चर्चा सुरू होती. ठोस निर्णय घेण्यासाठी पर्रीकर यांनी 14 फेब्रुवारी रोजी खाण भागातील आमदार व मंत्र्यांची बैठक बोलावली  होती. मात्र, त्याच दिवशी पर्रीकर यांचा आजार बळावल्यामुळे  त्यांना उपचारासाठी इस्पितळात भरती करावे लागल्याने या प्रश्‍नावर तोडगा काढण्यास सवड मिळाली नाही. पर्रीकरांच्या आजारपणामुळे  तातडीने उपाययोजना करण्यास अडचण आली आहे.