Sat, Mar 23, 2019 00:17होमपेज › Goa › ‘हातकातरो’ खांबाला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करा

‘हातकातरो’ खांबाला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करा

Published On: Dec 03 2017 12:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:26AM

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

गोव्यात स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या अत्याचाराची साक्ष असलेल्या जुने गोवे येथील ‘हातकातरो’  खांबाला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करावे अशी मागणी राष्ट्रप्रेमी नागरिक या संस्थेतर्फे पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

शैलेंद्र वेलिंगकर म्हणाले, की  गोवा सरकारने ‘हातकातरो’ खांबाचा इतिहासात व पर्यटन स्थळाच्या यादीत  उल्लेख करावा. हातकातरो खांबाच्या शेजारी या खांबाचा इतिहास लिहीलेला फलक प्रदर्शित करावा. सर्व पर्यटकांना या खांबाची ओळख व्हावी यासाठी आवश्यक त्या सूचना फलकावर लिहाव्यात.

सध्या या खांबाची  अवस्था दयनीय झाली असून त्याची डागडुगी करण्यात यावी. खांबाच्या   रक्षणासाठी संरक्षण कुंपन घालावे. सरकारने 19 डिसेंबर पूर्वी या ठिकाणाचे सौंदर्यीकरण करावे. या खांबाचा इतिहास पुसण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ते रोखण्यात यावेत, असे जयेश थळी यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत संस्थेचे पदाधिकारी जयेश थळी, भाई पंडीत, शैलेंद्र वेलिंगकर, राज बोरकर उपस्थित होते.