दाबोळी : प्रतिनिधी
दाबोळी विमानतळावर 12 लाख 36 हजार रुपये किमतीचे 462 ग्रॅम (सोन्याच्या 8 लहान कांड्या) सोने कस्टम अधिकार्यांनी दुबईहून बंगळूरकडे जाणार्या प्रवाशावर कारवाई करून जप्त केले. कस्टम विभागाकडून करण्यात आलेली या वर्षातील ही दुसरी कारवाई आहे. दाबोळी विमानतळावर कस्टच्या अधिकार्यांनी केलेल्या एका कारवाईत एअर इंडियाच्या (एआय - 994) विमानातून आलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली असता त्याने आपल्याकडे काही नसल्याचे सांगून कारवाईला विरोध केला.
त्यामुळे कस्टम अधिकार्यांचा त्याच्यावरील संशय बळावला. त्यांनी त्याला ग्रीन रूममध्ये नेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्या पार्श्वभागात त्याने लपवून ठेवलेल्या 8 सोन्याच्या कांड्या स्क्रीनवर दिसल्या़ कस्टम अधिकार्यांनी मग कांड्या हस्तगत केल्या. गोवा कस्टम सहायक आयुक्त जी़ बी़ सांतीमानो यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टमच्या पथकाने ही कारवाई केली असून कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनखाली कस्टम अधिकारी तपास करीत आहेत.