Fri, Apr 26, 2019 20:06होमपेज › Goa › पोलिस उपनिरीक्षक शेटकरविरुद्ध गुन्हा

पोलिस उपनिरीक्षक शेटकरविरुद्ध गुन्हा

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 04 2018 12:07AMपणजी : प्रतिनिधी

वेर्णा पोलिस स्थानकात नियुक्‍त असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल आर्सेला पार्सेकर (वय 20) हिच्या मृत्यूप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गौतम शेटकर याच्याविरोधात गुन्हा अन्वेषण विभागाने गुन्हा नोंदवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आर्सेला हिचा मृत्यू फेब्रुवारी महिन्यात झाला होता. लग्‍नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी उपनिरीक्षक गौतम शेटकर याच्यावर केला होता. याप्रकरणी पार्सेकर कुटुंबाने शेटकर विरोधात गुन्हा अन्वेषण विभागात फेब्रुवारी 2018 मध्ये तक्रार दाखल केली होती. 

त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी उपनिरीक्षक शेटकर विरोधात आर्सेला हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आर्सेला मृत्यूप्रकरणी आरोप झाल्यानंतर उपनिरीक्षक  शेटकर याची वेर्णा पोलिस स्थानकातून जीआरपीत बदली करण्यात आली होती.  

महिला पोलिस कॉन्स्टेबल 

आर्सेला  पार्सेकर व उपनिरीक्षक  गौतम शेटकर हे वेर्णा येथील पोलिस स्थानकात काम करीत होते. यावेळी  दोघांमध्ये   प्रेम  झाले. शेटकर यांनी आर्सेला हिला लग्‍नाचे आमिष दाखवून तिचा लैंगिक छळ केला.  जानेवारी (2018) महिन्याच्या अखेरीस  आर्सेला ही शेटकरसोबत पार्टीला गेली होती. पार्टीतून  घरी आल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.  आर्सेला हिचा मृत्यू आत्महत्या नसून  तिचा खून झाल्याचा आरोप यावेळी तिच्या कुटुंबीयांनी केला होता.