गोवा : मांगोरहिल भागात कोरोनाच्या उद्रेकाची शक्यता

Last Updated: Jun 03 2020 1:09PM
Responsive image


पणजी (गोवा) : पुढारी वृत्तसेवा

दक्षिण गोव्यातील मांगोरहिल-वास्को या दाट वस्तीत कोरोनासंबंधी केलेल्या चाचणीत सामूहिक प्रसार झाल्याची भीती निर्माण होत आहे. या भागातील सुमारे २०० लोकांची मंगळवारी केलेल्या प्राथमिक चाचणीत किमान ३४ ते ४० लोकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आल्याने पूर्ण वास्को शहरातील लोकामध्ये चिंतेचे वातावण पसरले आहे. 

मांगोरहिल येथे एका कुटुंबातील चार जणांसह सहा लोकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे मंगळवारी आरोग्य खात्याला आढळून आल्यावर सर्व मांगोरहिल परिसर सील करण्यात आला होता. या भागातील लोकांना बाहेर पडण्यास तसेच आत जाण्यासही पोलिसांनी मज्जाव केला आहे. 

या भागातील सर्व लोकांची कोरोना चाचणी सध्या सुरू आहे. या कुटुंबाशी संपर्कात आलेल्या शेजारी, दुकानदार व अन्य लोकांचा शोध घेतला जाऊन त्यांची चाचणीही केली जात आहे. या तपासणीत आणखीही लोक कोरोनाबाधित सापडण्याची शक्यता प्रशासकीय अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.