Thu, Jul 18, 2019 12:55होमपेज › Goa › खाणबंदी तोडग्याबाबत काँग्रेसची तुर्तास ‘चर्चा’च

खाणबंदी तोडग्याबाबत काँग्रेसची तुर्तास ‘चर्चा’च

Published On: May 31 2018 1:36AM | Last Updated: May 31 2018 12:16AMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री व आमदार प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखालील समितीने माजी अ‍ॅटर्नी जनरल अ‍ॅड. सुबोध कटंक यांच्यासोबत तीन तास  बैठक घेतली. आता अनुभवी कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. मनोहर उसगावकर यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील आठवड्यापर्यंत राज्य सरकाराला खाणबंदीबाबत तोडगा सूचविला जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते चंद्रकात कवळेकर यांनी दिली. 

घटक राज्यदिनानिमित्त बुधवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावून रात्री उशिरापर्यंत माजी अ‍ॅटर्नी जनरल अ‍ॅड. कटंक यांच्यासोबत खाणबंदीबाबत चर्चा करण्यात आली.  खाणबंदीबाबत विद्यमान परिस्थितीचा  तसेच राज्यापुढे असलेल्या अनेक पर्यायाचा बैठकीत चर्चा करण्यात आली.  आता यापुढे कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. उसगावकर  यांच्याशी चर्चा करून त्यानंतर आठवडाभरात सरकारपुढे तोडगा मांडला जाणार असल्याचे कवळेकर यांनी सांगितले. या बैठकीला समितीचे अध्यक्ष राणे यांच्यासोबत  विरोधी पक्षनेते कवळेकर, माजी मुख्यमंत्री तथा आ. दिगंबर कामत, आ. निळकंठ हळर्णकर आदी सदस्य उपस्थित होते. समितीचे पाचवे सदस्य आणि आ. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स कामानिमित्ताने गैरहजर राहिले. या बैठकीला माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप आणि अ‍ॅड. यतीश नाईक हेही उपस्थित होते.