Fri, Apr 19, 2019 12:22होमपेज › Goa › राफे ल लढाऊ विमान खरेदी हा मोठा घोटाळा

राफे ल लढाऊ विमान खरेदी हा मोठा घोटाळा

Published On: Aug 28 2018 1:25AM | Last Updated: Aug 28 2018 12:01AMपणजी : प्रतिनिधी

राफेल लढाऊ विमान खरेदी हा  देशातील संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पणजी काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेत केली.

चतुर्वेदी म्हणाल्या, की देशाच्या   संरक्षणासाठी राफेल लढाऊ विमान खरेदी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. मात्र, या खरेदी प्रकरणात मोठा घोटाळा झाला आहे. लढाऊ विमान खरेदीसाठी जादा किंमत देण्यात आली आहे.  राष्ट्र हिताच्या हे विरोधात आहे. या प्रकरणी सरकारने प्रत्यक्षात कसून चौकशी करणे आवश्यक होते. या विमान खरेदीमुळे जवळपास 41 हजार कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. कतार व इजिप्‍तने ज्या दराने ही विमाने खरेदी केली. त्यापेक्षा अधिक किंमतीत भारताने ती खरेदी केल्याचे समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

राफेल खरेदी घोटाळ्याच्या आरोपाच्या पार्श्‍वभूमीवर रिलायन्स कंपनीकडून काँग्रेसवर 5 हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा  ठोकण्यात  आला आहे. मात्र, हा दावा ठोकण्यात आला तरी काँग्रेस या घोटाळ्याविरोधात आवाज उठवत राहणार आहे. काँग्रेस गप्प बसणार नसल्याचा इशाराही यावेळी  चतुर्वेदी यांनी  दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर ,अ‍ॅड. रमाकांत खलप, सूनील कवठणकर, विजय पै  यावेळी हजर होते.