Thu, Feb 21, 2019 09:04होमपेज › Goa › काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा राजीनामा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा राजीनामा

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 12:17AMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शांताराम नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नव्या दमाच्या युवकांकडे   पक्षाचे नेतृत्व द्यायला हवे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवी दिल्‍लीत केलेल्या भाषणावेळी सांगितल्याने प्रभावित होऊन सदर निर्णय घेतला असल्याचे अ‍ॅड. नाईक यांनी  सांगितले.

राहुल गांधी यांच्याकडे हा राजीनामा मंंगळवारी सुपूर्द करण्यात आला. अ‍ॅड.नाईक यांच्याकडे   2017 मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. अ‍ॅॅड. नाईक म्हणाले, राहुल गांधी यांनी दिल्‍लीत काँग्रेसच्या महाअधिवेशनावेळी  केलेल्या भाषणात  पक्षाची धुरा युवा वर्गाकडे सोपवण्याची गरज असल्याचे मत व्यक्‍त केले होते. त्यांच्या या भाषणातून आपण इतके प्रभावित झालो की, प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेऊन राजीनामा  त्यांना सुपूर्द केला. तसेच गोेवा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा  युवा  नेतृत्वाकडे सोपवण्यात यावी, अशी मागणीही त्यांच्याकडे  करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा शक्य असल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिली.